अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- एकीकडे राज्यासह जिल्ह्यात देखील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे पारनेर तालुक्यात मात्र कोरोना रुग्ण संख्या घटण्यास तयार नाही.
नगर जिल्ह्यातील पारनेर वगळता सर्वच तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या घटली आहे. मात्र, पारनेरची कोरोना साखळी तुटण्यास तयार नाही. कोरोनाची दुसरीला आटोक्यात येत असताना पारनेर तालुक्यात मात्र रुग्णांचा आकडा वर खाली होत आहे.
यावर प्रशासनाने आता खबरदारीचे उपाय सुरू केले असून तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता ११ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच तालुक्यात लग्न वाढदिवस उद्घाटन किंवा कोणताही समारंभ यास पूर्व परवानगी आवश्यक आहे.
बाहेरुन आलेले पाहुणे ७ दिवस शाळेत क्वारंटाईन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियम न पाळल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आता या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील आकडेवारी कमी होण्यासाठी आमदार लंके सरसावले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना टेस्ट केली जाते त्यामुळे आकडा वाढतोय असा दावा त्यांनी केला असून, लवकरात लवकर ही आकडेवारी खाली येईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
तसेच पारनेर तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी उपयोजना सुरू केल्याचे देखील त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचला असताना तेथील सेवा आणि उपक्रम गाजले.
निलेश लंके यांनी अहोरात्र कोरोना रुग्णांसाठी स्वत:ला झोकून देत काम केले. त्यांच्या कामाची जागतिक पातळीवर देखील दखल घेण्यात आली. मात्र आता परत येथे कोरोनाने डोके वर आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम