‘या’ तहसीलदारांनी ३० वर्षापासून वादात अडकलेला रस्ता केला खुला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  राहुरी तालुक्यातील चेडगाव परिसरातील गेल्या तीस वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात अडगळीत पडलेला रस्ता तहसीलदार फसियोद्दीय शेख यांनी खुला केला आहे.त्यामुळे येथील शेतक-यांनी समाधान व्यक्त करत आता लोकसहभागातुन या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.

येथील जुना उंबरे ते लोहगाव रस्ता रस्त्यालगत असणार्‍या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांमध्ये वाद विकोपाला गेले होते.त्यामुळे हा रस्ता वादात सापडल्यामुळे तीस वर्षापासून अडगळीत पडला होता.

रस्त्यावर दोन्ही बाजुने अतिक्रमण, मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे,काट्या आदिं समस्यांनी हा रस्ता जवळजवळ बंद पडला होता.त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात शेतीमध्ये ये-जा करण्यासाठी तसेच दळणवळणासाठी अत्यंत कसरत करावी लागत होती.

त्यामुळे येथील ग्रामस्थांनी तहसीलदार शेख यांच्याकडे धाव घेऊन हा रस्ता खुला करावा अशी मागणी केली होती. तहसीलदारांनी देखील तात्काळ शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता रस्ता दुरुस्तीसाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजु समजुन घेत वाद-विवाद न होता

येथील अतिक्रमण धारक शेतक-यांना समाजावून सांगत हा रस्ता खुला करण्यासाठी आग्रही केले.तहसीलदारांनी समजावुन सांगितल्याने दोन्ही बाजूचे शेतकरी देखील तयार झाले.आणि हा रस्ता लगेच खुला करण्याचे आदेश तहसीलदार शेख यांनी दिले.

काही वेळातच तीस वर्षापासून बंद पडलेल्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याकामी उपसरपंच विकास तरवडे,तंटामुक्ती गाव समिती चे अध्यक्ष ज्ञानदेव जाधव,बांपुसाहेब तरवडे,आण्णा घुले, ज्ञानेश्वर घुमे,नवनाथ पुंड,मारूती खेडकर,नवनाथ गिरी,

गोरक गिरी,जगन्नाथ तरवडे, नामदेवहरी तरवडे,विष्णू तरवडे,प्रेञस खरात आदिंसह मंडलाधिकारी मेहञे तलाठी डोखे, ग्रामसेवक डुमणे आदिंनी परिश्रम घेतले. गेल्या तीस वर्षापासून बंद पडलेल्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत होते

त्यामुळे ही बाब आम्ही तहसीलदार शेख यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना तब्बल तीन तास आपल्या खास खुबीने तसेच कायदेशीर योग्य त्या बाबी समजावून सांगितल्याने कुठलाही वाद विवाद होऊ न देता या शेतक-यांना तयार केले.म्हणून हा रस्ता लवकर खुला झाला. तहसीलदार शेख यांचे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो.

संजय खरात,सरपंच येथील रस्त्याचे काम करण्यास काही शेतकरी अडथळा निर्माण करत होते.त्यांनी मोजणी ही केली होती.पण मोजणी नकाशा समजून न घेता त्याचा ते वेगळा अर्थ काढून रस्ता त्यांच्या क्षेत्रातून असल्याचा समज करून सदर रस्ता बंद केला होता.त्यांना समजावून सांगुन मोजणी कर्मचारी बोलावून परत हद्दी दाखवल्या.

लगेच जेसीबी बोलावून रस्त्याच्या बाजूला असलेले अडथळे,वाढलेले फांद्या तात्काळ तोडायला लावल्या.आता रस्ता सुंदर रस्ता झाला असुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. फसियोद्दीन शेख,तहसीलदार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe