दारु अड्डयावर पोलिसांकडून कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात नुकत्याच दारू अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असताना देखील पोलिसांनी आता पुन्हा या परिसरात छापे सत्र सुरू केले आहे.

रविवारी गुहा तसेच देवळाली परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असून २७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी रविवार दिनांक ११ जुलै रोजी येथील परिसरात हे छापे टाकले असुन

त्यांना अवैध मार्गाने दारू विक्री करताना काही अवैध व्यवसायिक आढळून आल्याने आरोपी रमेश रघुनाथ वर्पे,सोमनाथ महादेव बर्डे,अजय रामराव जाधव या तीघांवर मुंबई दारूबंदी कलम कायदा ६५ ई प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात पो.नि. नंदकुमार दुधावर हे रूजु झाल्यापासून त्यांनी अवैध दारू अड्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे त्यामुळे तालुक्यातील अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe