अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ नगरपंचायतला २ कोटी रुपयांचे बक्षीस !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियानामध्ये केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून नगरपंचायतला राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले.

या दोन कोटी रुपयांचा वापर येत्या वर्षभरात कर्जत शहराला पर्यावरण पूरक शहर म्हणून विकसित करण्याकरिता केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.

राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियान२०२०-२१ मध्ये कर्जत नगरपंचायत आणि कर्जत येथील लोकसहभागातून पर्यावरण पूरक काम करण्यात आले. यात राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. यात नगरपंचायतला दोन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

या बक्षीस रकमेच्या सहाय्याने शहरांमध्ये सात हरित उद्याने, सुसज्ज अशी रोपवाटिका, रस्त्याच्या दुतर्फा सौरदिवे, शहरामध्ये यापूर्वी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन, जुने आड बारव यांचे संवर्धन,

माझी वसुंधरा अभियान दोन अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन इत्यादी गोष्टींसाठी खर्च केला जाणार आहे. आलेला संपूर्ण निधी शहराचा पर्यावरणीय आरोग्यासाठी व शहर हरित करण्यासाठी वापरला जाणार असल्याने

शहराच्या पर्यावरणात येत्या वर्षभरात लक्षणीय बदल होणार आहे. नागरिकांनी माझी वसुंधरा अभियान दोनमध्ये सहभागी होऊन शहर स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी पुन्हा एकदा हातभार लावायचा आहे.

माझी वसुंधरा अभियान एकमध्ये नगरपंचायत कर्जतने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. माझी वसुंधरा अभियान दोन (२०२१-२२) मध्ये मात्र कर्जत नगरपंचायत संपूर्ण नागरिकांच्या सहभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, असा विश्वास मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe