मोठी बातमी : ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली आहे.

किनारपट्टीच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत असून मंगळवारी चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

चार जिल्ह्यांतील डोंगराळ परिसरात अतिमुसळधार पाऊस शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुणे,

औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा,

वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

तर नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe