अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- सोमवारी राज्यात ७,६०३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,६५,४०२ झाली आहे.
काल १५,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ५९,२७,७५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ % एवढे झाले आहे.
तर राज्यात आज रोजी एकूण १,०८,३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान राज्यात काल ५३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण ५३ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ९३ ने वाढली आहे.
हे ९३ मृत्यू, चंद्रपूर-१५, रायगड-१३, पुणे-१२, कोल्हापूर-११, सांगली-८, सातारा-७, अमरावती-६, अहमदनगर-५, नागपूर-३, पालघर-३, रत्नागिरी-३, सिंधुदूर्ग-२, ठाणे-२, वर्धा-२ आणि अकोला-१ असे आहेत.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४१,८६,४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,६५,४०२ (१३.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ५,८२,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम