अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- शहरात अनेक भागात मोठ्या संख्येने अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती समजल्याने तोफखाना व कोतवाली पोलिसांनी शहरातील विविध भागात छापे टाकले. या कारवाईत सुमारे ८८ लीटर दारूसह देशी दारुच्या सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तपोवन रोडवरील दळवी मळा, तोफखाना परिसरातील सोळातोटी कारंजा,
पंचरंग गल्ली, नेप्ती नाक्याजवळ बारवासमोरील काटवनात आदी चार ठिकाणी पोलिसांनी छापे टाकूण ७० लीटर हातभट्टी दारु जप्त केली आहे.
याप्रकरणी चौघ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोतवाली पोलिसांनी साठेवस्ती माळीवाडा परिसरात व कायनेटीक चौक परिसरात छापे मारुन हातभट्टी व देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी हेमंत शिवाजी सुरे याच्यासह बाबासाहेब कोंडीराम वैरागर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान ढवणवस्ती येथील एका बंद ट परीच्या आडोशाला छापा मारुन तोफखाना पोलिसांनी चेन्नई मटका चालविणाऱ्या एकावर कारवाई केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम