अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील डॉ.गणेश शेळके यांनी वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आ त्महत्या केली.या घटनेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य आधिकाऱ्यांनीही बेफीकीरी दाखवली आहे.
आपल्या खात्यातील एका जबाबदार अधिकाऱ्याने आत्महत्या करुन आठ दिवसांचा कालावधी उलटूनही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी डॉ.शेळके यांच्या कुटूंबाची भेट घेतली नाही. त्यांनी जाणीवपुर्वक याकडे दुर्लक्ष केले असल्याने या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शे तकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी केली आहे.
याबाबत दोन दिवसात गृहमंत्री व आरोग्यमंत्री यांना भेटणार असल्याचेही ते म्हणाले. दहातोंडे यांनी सांगितले की, कोरोना काळात डॉ.शेळके यांनी भरीव काम केलेले आहे. भरीव काम करण्याचे कौतुक तर दुरच, पण जाणीवपुर्वक छळवणूक केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळे डॉ.शेळके यांना स्वत:ला संपवून घ्यावे लागले. डॉ.शेळके यांच्या जाण्याने हळहळ करत अनेकांनी त्यांच्या कुटूंबाची भेट घेऊन धीर दिला. मात्र जिल्हा परिषदेतील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याला डॉ. शेळके यांच्या आत्मह त्येबाबत विचारपुस करुन वस्तुस्थिती जाणून घ्यावी वाटली नाही.
त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी कोणाचा बचाव करण्याचा तर प्रयत्न तर करत नाहीत ना अशी शंका येऊ लागली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई होईपर्यत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
परंतू जिल्हा परिषदेतील जबाबदार अधिकाऱ्यांनीही डॉ. शेळके यांच्या आत्महत्येनंतर बेफीकीरी दाखवली असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम