अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- सध्या एकीकडे कोरोना तर दुसरीकडे महागाई व आता चोरटे या संकटांचा सामना करताना सर्वसामान्य पुरता बेजार झाला आहे. जिल्ह्यातील काहीसा डोगराळ असलेल्या पाथर्डी तालुक्यात अलीकडे चोरी, रस्तालूट व गुंडगिरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
रात्रीच्या वेळी रस्त्याला दोरी आडवी बांधुन दुचाकीस्वाराला अडविले जाते. लुट करुन प्रसंगी गंभीर मारहाणही केली जाते. तालुक्यातील कोरडगाव या गावाच्या जवळ असलेल्या एका ओढ्याच्या ठिकाणी तिन ते चार लुटीच्या घटना घडल्या आहेत.
पोलिसांना मात्र अद्यापही चोर सापडत नाहीत. तालुक्यात वाळुतून पैसा आणि पैशातुन गुंडगिरी हे समीकरणही जोर धरत आहे.
बाजार असलेल्या गावात नागरीकांची ये जा असते. रात्रीच्या वेळी आठ वाजल्यापासुन ते अकरा वाजेपर्यंत निर्जन असलेल्या रस्त्यावर वाटमारी सुरु असते.
घरफोडीच्या देखील या भागात अनेक घटना घडत आहेत. पोलिसांत तक्रार देवुनही तपास लागत नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम