अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- आतपर्यंत नवीन वास्तू, पूल,रस्ता किंवा इतर कोणत्याही नवीन वस्तुचे उद्घाटन करण्यापूर्वी त्या वस्तुची पूजाआर्जा केली जाते.
मात्र जिल्ह्यातील एका नव्याने केलेल्या रस्त्याचे उद्घाटन करण्यापूर्वीच त्यावर चक्क नांगरच फिरवून रस्ता खराब केला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे.
तालुक्यातील करंजी येथील लक्ष्मीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे पंधरा दिवसांपूर्वीच खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अज्ञात शेतकऱ्याने काल रात्री हा रस्ता एक दोन ठिकाणी नांगराने खोदुन टाकल्याची घटना उघडकीस आली.
जिल्हा जिल्हा परिषदे अंतर्गत पूर्वी या रस्त्याचे खडीकरण करून त्यानंतर खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च करत आठ दिवसापूर्वीच या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.
त्यानंतर अज्ञाताने मध्यरात्री या रस्त्यावर एक दोन ठिकाणी नांगर फिरवून हा रस्ता खोदुन टाकला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम