खासदार डॉ सुजय विखे म्हणाले मंत्रिमंडळात पदाची अपेक्षा ठेवणे यात गैर नाही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं मुंडे समर्थक नाराज आहेत. कालपासून सुमारे ८० मुंडे समर्थकांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे तातडीनं दिल्लीला गेल्या असून तिथं वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाल्याचं समजतं.

या मुद्द्यावर अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे यांनी आपले मत मांडले आहे, ते म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी एक निर्णय घेतला आहे तो सर्वांना मान्य आहे. खासदार प्रीतम मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेश त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत याबाबत विचारले असता ते म्हणाले मुंडे नाराज नाहीत कार्यकर्त्यांची भावना आहे.

संभाव्य मंत्रिमंडळात पदाची अपेक्षा ठेवणे यात गैर नाही. ती नेत्यांची नव्हे कार्यकर्त्यांची नाराजी होती. ‘पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे नाराज नाहीत, त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. कोणत्याही नेत्याबद्दल कार्यकर्त्याच्या मनात आत्मीयता असते.

त्यामुळे आपल्या नेत्यासाठी त्यांना पक्षाकडून अपेक्षा असणे सहाजिक आहे. मात्र, भाजपमध्ये पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय अंतिम मानला जातो.

त्यामध्ये नंतर बदल होत नाही. पक्ष प्रत्येकालाच खूष करू शकत नाही. याचा विचार कार्यकर्त्यांनीही केला पाहिजे,’ असे सुजय विखे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe