मार्केट अपडेट्स : सोन्याचा भाव वाढला, चांदीही महागली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  राजधानीत मंगळवारी सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील सोन्याचा दर 90 रुपयांनी वाढून 46,856 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

मागील सत्रात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,766 रुपये होती. चांदीच्या दरात 490 रुपयांची वाढ झाली. यामुळे शहरातील चांदीचा दर प्रतिकिलो 67,988 रुपयांवर पोहोचला. मागील सत्रात दिल्लीमध्ये चांदीचा दर प्रति किलो 67,498 रुपये होता.

जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती – आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा दर प्रति औंस 1,809 डॉलरवर होता. दुसरीकडे, चांदीचा भाव प्रति औंस 26.21 डॉलर झाला.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “दिवसाच्या व्यापारात कमकुवत डॉलरमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली.” महाराष्ट्रात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली.

सोन्याच्या दरात 180 रुपयांची वाढ दिसून आली राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भाव 47,890 रुपये झाली आहे. गेल्या सत्रात सोन्याचा किंमत 47,710 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,890 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.

गेल्या सत्रात सोन्याचा किंमत 46,710 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.. पण चांदी प्रती किलो 300 रुपयांनी वाढली आहे. गेल्या सत्रात चांदीचा दर प्रति किलो 69,100 होता. तो आता वाढून 69,400 प्रति किलो झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe