अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- पेट्रोल पंपावरील कर्मचारी बँकेत भरणा करण्यासाठी घेवून जात असलेले ५५ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने डोळ्यात मिरचीची पूड टाकून लांबवले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिरसगाव शिवारातील अशोक दूध डेअरी व पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी दीपक देवरे (वय ३९)

file photo
हे श्रीरामपूर येथे भरण्याची रक्कम घेवून जात असताना अज्ञात व्यक्तीने देवरे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडे असलेले ५५ हजार ३०० रुपये लांबवले.
घटनेची माहिती मिळताच निरीक्षक संजय सानप हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची चौकशी करुन आरोपींचा शोध घेऊ असे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम