अहमदनगर :- ७० हजार रुपयांच्या खंडणीसाठी पतीचे अपहरण करण्यात आले आहे. याबाबत पत्नीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
नवनागापूर येथील शिवाजीनगर येथून आरोपीने पतीचे अपहरण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे मधुकर सुखदेव दुबे ( रा . शिवाजीनगर ) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे.
सोनू पराड ( पत्ता माहित नाही ) याने आपल्या पतीचे अपहरण केले आहे. अंजली मधुकर ठुबे वय ३२ ) हिने पोलिसांत धाव घेतली आहे. मोटारसायकल एम. एच. १६ डीबी ५६६६ यावरून पतीचे अपहरण केले आहे.
आरोपीने ७० हजार रुपये खंडणीची मागणी केली होती. मात्र, ठुबे याने ही रक्कम न दिल्याने त्याचे अपहरण करण्यात आले आहे.