अजित पवारांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं

Ahmednagarlive24
Published:

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे.  उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी आपण राष्ट्रवादीतच आहोत आणि भाजपसोबत मिळून सत्तास्थापन करण्याचं ट्वीट केलं.

‘भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवार यांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं आहे’, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांनी ट्विटरवरुन राष्ट्रवादीसोबत असल्याचा दावा केल्यानंतर पवारांनीही ट्विटरवरुनच आपली भूमिका मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी शिवसेना आणि काँग्रेस पक्षासोबत आघाडी करुन सत्तास्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य खोटं आहे, तसेच अजित पवार हे दिशाभूल करत आहेत.
लोकांमध्ये संभ्रम निर्माण करुन, चुकीचा समज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment