अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- आता पर्यंत वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषण केल्याचे आपण पाहिले होते. मात्र स्मशानभुमीसाठी जागा मिळण्यासाठी उपोषण केले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील भिल्ल समाजाच्या स्मशानभुमीसाठी शेती महामंडळाची जागा मिळावी. या मागणीसाठी आदिवासी प्रबोधन सेवा संघाच्या वतीने श्रीरामपूर येथे तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. भिल्ल समाजातील लोकांसाठी पढेगाव येथे स्मशानभुमी नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांची मोठी कुचंबना होत आहे.
त्यामुळे शेती महामंडळाची जागा त्यासाठी मिळावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने वारंवार करण्यात आली. यासंदर्भात नुकतेच पालकमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले.
हे शेती महामंडळाचे क्षेत्र वाटपास काढण्यात आले आहे. त्याचे वाटप न करता ते सार्वजनिक प्रयोजनाकरीता राखीव ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.
ही मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी आदिवासी प्रबोधन सेवा संघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
या विषयात गावाला प्राधान्य देऊ, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम