गावठी कट्ट्यासह एकास पकडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन परिसरामध्ये असणाऱ्या जैनब मस्जिद जवळ सरफराज बाबा शेख उर्फ सर्फ्या (रा.-वॉर्ड नंबर 2,श्रीरामपूर)याला एक गावठी कट्टा व राऊंडसह पोलिसांनी पकडले आहे.

त्याच्याकडे मिळालेल्या कट्टयाची किंमत सुमारे 25 हजार रुपये इतकी असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील,अपर पोलिस अधीक्षक डॉक्टर सौ. दिपाली काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.संदीप मिटके,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप

यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री.साळवी,पोलीस नाईक श्री.करमल, पोलीस शिपाई श्री .दिघे ,जाधव ,नरवडे ,गोसावी यांच्या पथकाकडुन करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe