अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र मागील पाच वर्षांत शिवसेनेला मित्रपक्षाकडून कटू अनुभव आल्याचे सांगत काही पक्ष निवडणूक जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांची खोटी कर्जमाफी करत असतात.
परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवल्याने प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. श्रीरामपुरात ते शिवसंपर्क अभियानाप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे आदी प्रमुख उपस्थित होते.
राज्यमंत्री गडाख म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी वेळोवेळी जनतेसमोर येऊन कुटुंबातील एका व्यक्तीप्रमाणे मार्गदर्शन करीत जनतेला सावरले. त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आला.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे चांगले काम करत आहेत म्हणून ते घराघरात पोहोचले आहेत.
भविष्यात येऊ घातलेल्या नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण खंबीरपणे शिवसैनिकांच्या पाठिशी उभी राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी प्रास्ताविक केले. उपतालुकाप्रमुख प्रदीप वाघ यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांनी आभार मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम