अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- बैलगाडा शर्यती आयोजित करण्यास बंदी आहे.सध्या कोरोनामुळे तर सर्वच यात्रा-जत्रा आणि कार्यक्रमांनाही बंदी आहे.
असे असूनही पारनेर तालुक्यातील शिरापूर गावात बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे पोलीस पथकासह गावात आल्या. मात्र, पथक पोहचेपर्यंत शर्यती संपवून सर्वजण निघून गेले होते.
मात्र, व्हिडिओ आणि ग्रामपंचायतीत आढळून आलेल्या रजिस्टरच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात एक शिपाई होता.
तेथे एक रजिस्टर आढळून आले. त्यामध्ये शर्यतीत भाग घेतलेल्या लोकांची नावे, हिशोब असा मजकूर होता. याशिवाय त्या शिपायाच्या मोबाईलमध्ये शर्यतीचे व्हिडिओ आणि फोटो होते. ते सर्व ताब्यात घेण्यात आले. त्या आधारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
तहसीलदार देवरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विनायकुमार बोत्रे यांच्या पथकाने ही करवाई केली. ग्रामविकास अधिकारी मीना जनार्दन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शर्यत आयोजित करणारे गुंडा भोसले,
संभाजी नरसाळे, संतोष शिणारे, संतोष गुंजाळ, दत्ता ताठे (रा. शिरापूर ता. पारनेर), अर्जुन लामखडे, रुपेश लामखडे (रा. निघोज ता. पारनेर) यांच्यासह अन्य लोकांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पारनेर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने राज्यभर चिंता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीतही स्थानिक पातळीवर ग्रामस्थ कसे बेजबाबदारपणे वागत आहेत,
मागील आठवड्यातच ५० लोकांसाठी परवानगी घेऊन सुमारे ३०० लोकांच्या उपस्थितीत एक लग्न सोहळा सुरू होता. याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार ज्योती देवरे तेथे गेल्या. त्यांनी उपस्थितांना खडेबोल सुनावत मंगल कार्यालय चालकाला दहा हजार रुपयांचा दंड केला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम