श्रीगोंदे :- तालुक्यातील नगर-दौंड महामार्गावर विसापूर फाट्याजवळ टाटा सफारी वाहनाचा वेग चालकाला आवरता न आल्याने वाहन उलटून चालक जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले.
महानुभाव पंथाच्या लोकांना धार्मिक कार्यासाठी नगरहून फलटणकडे घेऊन जाणाऱ्या टाटा सफारी (एमएच १६. एजे ५०६७) वाहनाचा रविवारी सकाळी ७ च्या सुमारास विसापूरफाट्या जवळ अपघात होऊन वाहनचालक चंदन किसन शिंदे (४२ वर्ष, सिव्हिल हडको, अहमदनगर) हा जागीच ठार झाला, तर ३ जण जखमी झाले.