धक्कादायक ! फिल्ममेकिंगच्या नावाखाली ‘हा’ दिग्गज निर्माता चालवत होता सेक्स रॅकेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  एका प्रोडक्शन कंपनीच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या हॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्मात्याला अटक करण्यात आली आहे. निर्माता डिल्लन जॉर्डनला कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नाडिओ काउंटीमधून अटक करण्यात आली आहे.

डेडलाइनने दिलेल्या अहवालात त्याच्याविरूद्ध दाखल केलेल्या खटल्यानुसार असे म्हटले जाते की हॉलिवूड चित्रपट निर्मात्याने 2010 ते मे 2017 पर्यंत अमेरिकेत राहणाऱ्या आणि जॉर्डनच्या ग्राहकांशी पैशाच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांचे एक रोस्टर ठेवले होते.

‘ही’ महिला त्याच्या कामात मदत करायची – जॉर्डन हा लंडनच्या एका महिलेशी संपर्कात होता ज्याच्याशी तो ग्राहक आणि प्रॉस्टिट्यूट्स यांच्याशी संबंधित माहिती सामायिक करीत असे. कोर्टाच्या पेपरमध्ये महिलेचे नाव समोर आले नाही.

या अहवालानुसार निर्माता जॉर्डन स्वत: या वेश्यांकरिता प्रवासाची व्यवस्था करीत असत किंवा अन्यथा ग्राहकांना वेश्यासाठी आंतरराज्य वाहतुकीची व्यवस्था करण्याच्या सूचना देत असत.

खूप हुशारीने फीस घ्यायचा – मॉडेलिंग, अपीयरेंस, कंसल्टिंग, मसाज थेरपी किंवा हाऊस पार्टीसाठी आकारल्या जाणाऱ्या चार्ज च्या स्वरूपात पैशांना दाखवायचा. अमेरिकेचे Attorney Audrey Strauss यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

‘डिलन जॉर्डन अनेक वर्षांपासून आपल्या 2 मोठ्या कंपन्यांच्या आड वेश्याव्यवसाय रॅकेट चालवत आहे. तो लोकांना दाखवण्यासाठी फिल्म प्रोडक्शन कंपन्या, कार्यक्रम नियोजन आणि पार्टी नियोजन कंपन्या चालवत असे.

कोर्टाने डिलन यांना या सूचना दिल्या – अ‍ॅटर्नी म्हणाले की आता पार्टी ओवर झाली असून चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. डिलनला नुकताच जामिनावर सुटका करण्यात आली असली तरी, या प्रकरणातील कोणत्याही साक्षीदार किंवा पीडितांशी संपर्क न ठेवण्याच्या सूचना त्याला देण्यात आल्या आहेत.

या व्यतिरिक्त कोर्टाने त्याला कोणत्याही प्रकारची शस्त्रे कोर्टाच्या स्वाधीन करण्याचे आणि कोणत्याही प्रकारची ड्रग्स न वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe