राहुरीत दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार

Ahmednagarlive24
Published:

राहुरी :- तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार झाले. शनिवारी मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास नगर-मनमाड मार्गावर या घटना घडल्या आहेत.

पहिला अपघात राहुरी फॅक्टरी येथील संख्येश्वर पेट्रोल पंपाजवळ झाला. रमेशकुमार थापा (वय २१, नेपाळ) हा तरूण मोटरसायकलीवरून (एमएच १७ एए ७९९६) राहुरीकडून लोणीच्या दिशेने जात होता.

राहुरी फॅक्टरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून रमेशकुमार जागीच ठार झाला. त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला.

दुसरा अपघात राहुरीच्या मुळा नदी पुलाजवळ घडला. वाहनाची धडक बसून अज्ञात ७० वर्षे वयाची व्यक्ती ठार झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment