मोदी सरकारने सर्वसामान्य, गोरगरिबांचे संसार उदवस्थ केले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :-  केंद्र सरकारने निर्माण केलेल्या महागाई विरोधात श्रीगोदे युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध म्हणून शहरातील सिद्धेश्वर चौकापासून काळकाई चौक, होनराव चौक,

रविवार पेठमार्गे तहसील कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढून सरकारचा निषेध करत महागाई त्वरित कमी करावी व जनतेला दिलासा द्यावा, याकरिता श्रीगोंदे तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन दिले. या आंदोलनास शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला.

यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत ओगले म्हणाले, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून या मोदी सरकारने बड्या उद्योगपतींच्या धोरणानुसार सरकारचा गाडा हाकायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून मोदी सरकारने सामान्य जनतेवर अन्याय करणारे निर्णय लादण्यास सुरुवात केली.

कोणतीही जनतेच्या हिताची, विकासाची कामे आजपर्यंत या सरकारने केलेली नाही. सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्कील करून ठेवले. महागाई म्हणजे विकास अशी या मोदी सरकारची धारणा झाली.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस, खाद्यतेल, डाळी, औषधे, खते, बी-बियाणे यांच्या किंमती भरमसाठ वाडवून ठेवल्या. गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले. किंमत इतकी वाढली, तर जनतेला उपाशी पोटी झोपावे लागेल,

याची देखील या सरकारला कुठलीच चाड राहिलेली नाही. म्हणजे मोदी सरकरन सर्वसामान्य गोरगरीब यांचे प्रपंच उद्ध्वस्त केले. सत्तेत येण्यासाठी जनतेला वेगवेगळ्या भूलथापा मारल्या. परंतु प्रत्यक्षात हे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र सर्व सामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आली, असेही ओगले यांनी सांगितले.

मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेस पक्ष राज्यव्यापी आंदोलन करीत आहे. त्याचाच भाग म्हणून श्रीगोंदे तालुका व शहर युवक काँगेस पक्षाच्या वतीने बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात

येऊन सरकारचा निषेध करत महागाई त्वरित कमी करावी व जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी सांगितले. श्रीगोंदे तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe