अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- शिर्डीतील साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांना विश्वस्तपदासाठी डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अजित पवार समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.
विश्वस्तांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक डावलले गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था व महामंडळांच्या नियुक्त्या मध्ये उपमुख्यमंत्री अजित अजित पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो, मात्र शिर्डी संस्थान त्यास अपवाद ठरले आहे.
शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ यांना जास्तीत जास्त प्रमाणात विश्वस्त मंडळात प्राधान्य मिळाले तर शिर्डीसह परिसराचा विकासाला गती प्राप्त होईल.
शिर्डी संस्थानची संभाव्य यादी सोशल मीडियाच्या व इतर माध्यमांच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाली असून उपमुख्यमंत्री यांची जवळची अनेक नावे डावलले गेल्याने त्यांचे समर्थकांंमध्ये नाराजीचा सूर दिसून आला आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांचे विश्वासू असणारे संग्राम कोते पाटील हे उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे समजते. मात्र राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने ते शक्य नसल्याचे कारण त्यांना पक्षाकडून सांगण्यात आले.
पक्ष त्यांना विश्वस्तपद द्यायला पक्ष तयार होता मात्र आपण कुठल्याही पदासाठी इच्छुक नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतांंना त्यांनी भरीव स्वरूपाचे काम महाराष्ट्रामध्ये उभे केले होते.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आ.संग्राम जगताप यांनी देखील नगरमधील एक नाव सुचवले होते.ते देखील डावलले गेल्याने अजित पवार यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम