अहमदनगर :- आईचा गळा दाबून खून केल्यानंतर २४ वर्षीय मनोरुग्ण मुलाने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. भिंगार येथील लकारगल्लीत रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.
शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. भिंगार कॅम्प पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले. या घटनेने भिंगार परिसरात खळबळ उडाली आहे.
नंदा बापू बेंद्रे (वय ४५), राहुल बापू बेंद्रे (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही घटना कोणत्या कारणातून घडली, हे अद्याप समोर आलेले नाही. नंदा बेंद्रे व मुलगा राहुल रविवारी रात्री एकटेच घरी होते, तर बापू बेंद्रे महानगरपालिकेत पाणीपुरवठा विभागात कर्मचारी आहेत.
रविवारी रात्री बापू बेंद्रे यांची ड्युटी असल्याने ते घराबाहेरच होते. त्याच दरम्यान राहुलने आई नंदा हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.