अकरावी प्रवेशासाठी आता स्वतंत्र सीईटी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  दहावीच्या निकालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाणार आहे. साधारणपणे २१ ऑगस्टपर्यंत ती आयोजित केली जाईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

सीईटीसाठी सोमवारपासून (१९ जुलै) अर्ज स्वीकारले जातील. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र पोर्टलद्वारे अर्ज उपलब्ध करण्यात येत आहेत, असेही पाटील म्हणाले. कोरोना संकटामुळे राज्य सरकारने यंदा इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर केला आहे.

मात्र, अकरावीच्या प्रवेशासंदर्भात बोर्डाने पर्यायी स्वरूपाची सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही सीईटी राज्य मंडळामार्फत घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज ओपन करता येईल.

त्यामध्ये दोन प्रश्न विचारले जातील. सीईटीसाठी तुम्ही इच्छुक आहात का आणि इच्छुक नाहीत का?, असे पर्याय विचारले जातील. हवा तो पर्याय निवडून विद्यार्थी अर्ज करू शकतील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी विनाशुल्क असेल.

मात्र अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश दुसऱ्या टप्प्यांत दिले जातील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!