सावधान! कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतोय  जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद ; आता हे दोन तालुके आहेत टॉपला

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  एकीकडे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र असतानाच मात्र काहीशी चिंता वाढत आहे कारण दिवसेंदिवस परत एकदा कोरोना बाधीत रुग्णांची  आकडेवारी वाढत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे आता परत एकदा सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. आता अनेक ठिकाणी लसीकरण व जिल्ह्यासह राज्यात निर्बंध लागू करण्यात आल्याने दुसऱ्या लाटेचा जोर बऱ्यापैकी  ओसरत आला आहे.

मात्र मागील तिन ते चार दिवसांपासून परत एकदा बाधीतांचे आकडे वाढत असल्याने प्रशासनासह सर्वसामान्य देखील चिंतेत पडले आहेत.

जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांची नोंद झाली आहे. यात प्रामुख्याने संगमनेर, पाथर्डी आणि पारनेर या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १८, खाजगी प्रयोगशाळेत  केलेल्या तपासणीत ३३८ आणि अँटीजेन चाचणीत ४०२ रुग्ण बाधीत आढळले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe