मुंबई : आपलेच सरकार स्थापन होणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असा दिलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ‘रेडीसाँ’ या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांनी संयुक्तरीत्या या आमदारांशी संवाद साधला.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी संवाद साधला. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. आपलेच सरकार येणार आहे, असा विश्वास या दोघांनी या वेळी आमदारांना दिला.
शरद पवार यांनी आमदारांना थेट प्रश्न विचारत, तुमची काही अडचण आहे काय? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे काय, अशी विचारणा केली. तेव्हा काही आमदारांनी त्यांना अजित पवार यांच्याकडून फोन आल्याचे सांगितले. मात्र आम्ही तुमच्यासोबतच असल्याचा विश्वासही या वेळी या आमदारांनी पवार यांना दिला.