पोलीस निरीक्षक सुट्टीवर जाताच ‘ या’ शहरात आठ ठिकाणी घरफोडी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात शनिवारी राञी दहा ते पंधरा चोरांच्या टोळक्याने आठ ठिकाणी घरफोडी करुन सोने, चांदी सह रोख रक्कम असा एकुण 1लाख 36 हजाराचा ऐवज लुटुन लंपास केला आहे.

राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ सुट्टीववर जाताच चोरट्यांनी देवळाली प्रवरात राञभर धुमाकुळ घातला. राञीच्या गस्तीवरील पोलीस कुठे होते असा प्रश्न पुढे येत आहे. 50 हजार लोकसंख्या असलेल्या शहरात राञीच्या गस्तीवर अवघ्या एका पोलिसाची नेमणूक केली जाते. पोलीस चौकी ‘असून अडचण नसुन खोळंबा’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. देवळाली प्रवरा शहरात शनिवारी राञी ते रविवारी पहाटे पर्यंत दहा ते पंधरा जणांच्या चोरट्यांच्या टोळीने राञभर धुमाकुळ घातला.

राञी 1;30 वाजण्याच्या सुमारास सेवानिवृत्त शिक्षक अच्युत नांदुर्डीकर यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडुन बंगल्यातील कपाटे व सामानाची उचकापाचक करुन मोठा ऐवज नेला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नांदुर्डीकर सध्या त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास आहे.चोरी झाल्या नंतर आज दुपारी 3 वाजेपर्यंत उपस्थित न झाल्याने नेमका किती ऐवज गेला हे समजू शकले नाही. चोरट्यांनी शेजारील बंद बंगल्याचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला पण चोरट्यांची तेथे निराशा झाली.

काही महिन्यापूर्वीच बंगल्याचे मालक सेवानिवृत्त शिक्षक विलास पवार हे लाख (ता.राहुरी) येथे शेतात राहण्यासाठी गेले असल्याने बंगला मोकळा असल्याने हाती काहीच लागले नाही. या बंगल्यापासून जवळच असलेल्या सोमनाथ पठारे यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळविला. पठारे हे शनिवारी सकाळी कुटुंबासह पुणे येथे गेले होते. पुण्यावरुन ते कोल्हापूर येथे जाणार होते. पठारे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी उचकापाचक करुन सामानाचा ढिग घालुन ठेवला होता.

कपातील सोन्याचे दागिणे चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असा एकुण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. पठारे यांच्या बंगल्यातील टाँयलेटचा वापर यावेळी चोरट्यांनी केला. त्यांनतर चोरट्यांनी अमित सुरेश अंबिलवादे यांच्या सोन्याच्या दुकानाचे कुलपे तोडून दुकानातील 750 ग्रँम चांदी व दुरुस्ती आलेले दागिणे असा एकुण एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

शेजारीच राहणाऱ्या शिरीष लोखंडे या शिक्षकाच्या बंद घराचे कुलप तोडून मोठा ऐवज नेला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे शिक्षक दांपत्य सुपा येथीलल घरी गेले असल्याने नेमका किती ऐवज गेला हे समजू शकले नाही. या दुकानात चोरी करण्यापुर्वी कटारीया यांच्या बंगल्याच्या गेट मधुन बँटरी लावून पाहिले. त्याच वेळी कटारीया यांच्या किराणा दुकाना समोर आठ ते दहा चोरटे उभे असल्याचे सी.सी.टिव्ही मध्ये कैद झाले.

पाठीवर सँक लटकवलेल्या तोडांला काळे फडके बांधलेल्या अवस्थेत सी.सी.टिव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे. या ठिकाणाहून खांदे गल्लीतील आनंद देसर्डा यांचे साई आनंद किराणा या दुकानाचे कुलपे तोडीत असताना जवळच असलेल्या काका मिसाळ यांनी घराच्या छतावरुन पाहिले. काका मिसाळ यांनी संतोष मुथ्था यांना फोन करुन दुकान फोडीत असल्याची माहिती दिली. मुथ्था यांनी आनंद देसर्डा यांना फोन करुन चोरीची माहिती दिली.आनंद देसर्डा यांनी दुकानाकडे धाव घेतली.

त्यावेळी चोरटे सेंटर लाँक उघडीत होते. मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी काढता पाय घेतला.यावेळी देसर्डा यांना चार ते पाच चोरटे दुकानामागीलल शेतात पळूण गेले. शेतातून निवृत्ती खांदे यांच्या घराकडे मोर्चा वळीला.घराचा मागिल धारवाजे कुलूप तोडून घरातील कपाटांची उचकापाचक करीत कपाटातील 3 हजार रुपये रक्कम चोरट्यांनी चोरुन नेले. देवळाली डेपो येथील जालिंदर भांड यांच्या अवधूत मेडिकलचे शटर्स चोरट्यांनी उचकटले.

चोरट्यांनी श्रीरामपूर रस्त्यालगत रेणुका पंपा जवळील मगबुल गफुर पटेल यांच्या घराची आतील बाजूने लावलेली कडी गजाच्या साह्याने उघडून पटेल झोपलेल्या पलंगास चोरट्यांनी वेढा दिला. हातात हत्यार व एकाच्या हातात पिस्तुल असल्याचे त्यांनी पाहिले. चोरट्यांनी हिंदी भाषेतुन कपाटाच्या चाव्या मागितल्या. कपाट उघडेच आहे आसे सांगितल्यावर दोन चोरट्यांनी कपाटाची उचका पाचक करुन 15 हजाराची रोख रक्कम हाथी लागली.

चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पटेल यांचा मुलगा अमजद ज्या खोलीत झोपला होता. त्या खोलीचा दरवाजाची बाहेरुन कडी लावून घेण्यात आली होती.घरात कोणी तरी शिरल्याचा संशय आल्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतू दरवाजा बाहेरुन लावलेला असल्याने अमजद पटेल याने शेजारी राहणारे युनूस शेख यांना फोन लावून चोरांची माहिती दिली. युनूस शेख व त्यांचे दोन बंधु बाहेर आले.

चोरांच्या मागे पळू लागले असता चोरट्यांनी त्यांच्यावर दगडाचा वर्षाव केला.अचानक दगड समोर पडू लागल्याने शेख बंधु मागे फिरले. चोरटे श्रीरामपूर रस्त्याने चव्हाण वस्तीकडे पळाले. त्या ठिकाणी चोरट्यांचा टेंपो उभा होता. अनेक ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या नंतर सकाळी ठसेतज्ञ पथकास पाचारण करण्यात आले होते.

ठसेतज्ञ प्रमुख पांडुरंग फंड पो.काँ. एम आर खरपुडे यांनी घरफोडीच्या ठिकाणी ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू चोरट्यांनी हँडग्लोज घालून घरफोड्या केल्याने कोणत्याही ठिकाणी ठसे मिळून आले नाही. दरम्यान श्वान पथकास पाचारण करण्यात आले.मिस्का नावाच्या श्वानाने पठारे, नांदुर्डीकर, पवार यांच्या बंगल्या पासुन शिरीष लोखंडे पर्यंत माग काढला.

लोखंडे यांच्या घरातून मागिल दरवाजाने अब्दुल हमीद चौकातुन वीटभट्टी मार्गे देवळाली प्रवरा ते श्रीरामपूर फुट रस्त्याने ओढ्या पर्यंत माग काढला. मगबुल पटेल यांच्या दारात चोरट्याची चप्पल राहिली होती. श्वानास त्या चपलेचा वास दिला असता श्वान श्रीरामपूर रस्त्याने चव्हाण वस्तीपर्यंत माग काढला.या वस्तीवरील एका महिलेने पहाटे 4 वाजता येथे एक टेम्पो उभा होता,असे पोलीसांना सांगितले.

पहाटे 4 वाजता नगर मनमाड व श्रीरामपूर रस्त्यावर नाकेबंदी केली असती तर चोरटे पोलीसांना अलगद सापडले असते. परंतू गस्तीवरील पोलीसांना घरफोडीची घटना सकाळी 7 वाजता समजते यावरुन गस्तीवरील पोलीस खरंच गस्तीवर होते का?देवळाली प्रवरा पोलीस चौकीत सात पोलीसांची नेमणूक करण्यात आली आहे.परंतू एक हि पोलीस चौकीवर थांबत नाही.

घरफोडीच्या ठिकाणी एका वाळू एजंटने तर या पोलीस चौकीतील एक पोलीस गस्तीवर असल्यावर गस्त घालण्याऐवजी नदीचा पट्टा व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून असतो. वाळूची गाडी पकडून राञीच तोडपाणी करुन सोडून दिली जाते. देवळाली प्रवरा पोलीस चौकी असुन अडचन नसुन खोळंबा अशी अवस्था झाली आहे. देवळाली प्रवराची लोकसंख्या 50 हजारा पर्यंत पोहचली आहे. स्वतंञ पोलीस स्टेशन होणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe