अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहराजवळ असणाऱ्या रांजणखोल येथील येथे ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली.
रांजणखोल गावातील भाऊसाहेब काशिनाथ पडवळ(वय ४५ वर्ष)यांनी श्रीरामपूर ते चितळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर रेल्वे गाडी खाली आत्महत्या केली आहे.
सुरुवातीला या घटनास्थळाजवळ पडवळ यांच्या ताब्यातील मोटरसायकल स्प्लेंडर (एम एच 17 एच 6855) मिळून आली होती.
दुचाकी मिळून आल्याने पडवळ यांची ओळख पटविण्यास येत असलेली अडचण दूर झाली. श्रीरामपूर पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याकामी अथक परिश्रम घेतले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम