अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील कमालपुर या गावामध्ये राहणाऱ्या फिरोज शेरखान पठाण ,वय 24 वर्षे, धंदा -घरकाम याने घरगुती कारणावरून त्याची पत्नी शबाना फिरोज पठाण हिला भाजीपाला कापण्याच्या विळीने मारहाण केल्याची घटना घडली आहे
या मारहाणीमध्ये शबाना यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्या हाता पायावर मुका मार लागला आहे. हे भांडण सोडवण्यासाठी शबाना यांचे वडील व आई यामध्ये पडले असता
आरोपी फिरोज याने त्या दोघांना देखील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या सर्व घटनेवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
असून पुढील तपास पोलिस निरीक्षक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गाडेकर हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम