अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- आकाशवाणीवर 2014 पासून सुरू झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामुळे आकाशवाणीने कोट्यावधीची धन कमावले आहे, अशी माहिती राज्यसभेत सोमवारी देण्यात आली.
या कार्यक्रमाने २०१४ मध्ये प्रक्षेपण झाल्यापासून आकाशवाणीने ३०.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०१६-१७-१८ मध्ये १०.६४ कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती देण्यात आली. ‘मन की बात’ हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता रेडिओ आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांद्वारे प्रसारित केला जातो.
प्रसार भारती यांनी आॅल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन नेटवर्क आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत ‘मन की बात’ कार्यक्रमाचे ७८ भाग प्रसारित केले आहेत, अशी माहिती माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
हा कार्यक्रम देशभरातील केबल आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर सुमारे १९ खासगी उपग्रह टीव्ही वाहिन्यांद्वारे दाखवला जातो अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. मंत्रालयाने आपल्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१-१-15 मध्ये या उपक्रमाला १.१६ कोटी रुपये, २०१४-१५ मध्ये २.८१ कोटी रुपये,
२०१५-१६ मध्ये ५.१४ कोटी आणि २०१६-१७ मध्ये १०.६४ कोटी रुपयांची कमाई २०१७-१८ मध्ये झाली. २०१८-१९ मध्ये ७.४७ कोटी रुपये, २०१९-२०२० मध्ये २.५६ कोटी मध्ये आणि २०२०-२१ मध्ये १.०२ कोटी रुपये उत्पन्न मिळवले.
भारतातील सर्वात लोकप्रिय दूरदर्शनवरील रेडिओ कार्यक्रमात ‘मन की बात’च्या प्रेक्षकांची संख्या मोठी आहे, असे ठाकूर म्हणाले. टेलिव्हिजन वाहिन्यांच्या ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने (बीएआरसी) मोजलेल्या प्रेक्षकांच्या आकडेवारीनुसार, २०१८ ते २०२० या कालावधीत या कार्यक्रमाच्या दर्शकांची संख्या अंदाजे ६ कोटी ते १४.३५ कोटी इतकी आहे,
असेही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे रेडिओच्या माध्यमातून देशभरातील जनतेपर्यंत पोहोचणे आहे,” असे ठाकूर यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम