प्रेग्नेंसी बायबल या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी.

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अभिनेत्री करीना कपूर (खान) व आदिती शहा लिखित प्रकाशक जरनॉट बुक्सच्या मुख्यपृष्ठावर प्रेग्नेंसी बायबल म्हणून प्रकाशित पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीचे निवेदन ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले

यावेळी समन्वय समितीचे संचालक विलास जाधव, रेव. जे.आर. वाघमारे, अहमदनगर पहिली मंडळी चर्चचे सॅम्युएल खरात, ख्रिस्ती समन्वय समितीचे सुनील बनसोडे, रेव्ह. संजय पारधे, संजय वाकडे, डॉ.विजया जाधव,

मेजर भारत हिवाळे, सामाजिक कार्यकर्ते राजू देठे आदी उपस्थित होते. अभिनेत्री करीना कपूर (खान) व आदिती शहा भिमजेनी लेखिका शीतल भल्ला तसेच प्रकाशक जरनॉट बुक्स यांनी संगनमताने प्रेग्नेंसी बायबल याचे उल्लेख मुख्य पृष्ठ वरील शीर्षकात करून त्यांनी संपूर्ण ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.

त्यांनी त्यांच्या प्रसिद्धीसाठी हे कृत्य केलेले आहे त्यामुळे भारतीय संस्कृतीला तडा बसला आहे त्यांच्या हव्यासापोटी समाजात तेढ वादंग निर्माण होत आहे याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी आणि ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने सिने अभिनेत्री म्हणून येणाऱ्या करीना कपूर सहलेखिका आदिती शहा तसेच प्रकाशक यांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करून

तथाकथित प्रेग्नेंसी बायबल मुख्यपृष्ठ वरील शीर्षकातील केवळ बायबल हा शीर्षक वगळून चालणार नसून कायमचा चाप बसावा म्हणून संपूर्ण पुस्तकावर बंदी घालून

त्यांची विक्री तत्काळ थांबवावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News