सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी या गावातून माहिती अधिकार कायद्याची निर्मिती झाली परंतु त्याच जिल्ह्यातील व त्यास तालुक्यातील अधिकारी माहिती अधिकार कायदा व माहिती अधिकार अर्ज ची पायमल्ली करत आहे

अनेक वेळा माहिती अधिकारात अर्ज करून सुनावणी होऊनही माहिती मिळत नसल्याने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषणास सुरुवात करण्यात आली

यावेळी सावकारग्रस्त शेतकरी समितीचे अध्यक्ष रावसाहेब गाजरे, उपाध्यक्ष रामदास टेकुडे, सचिन नरवडे, विष्णू वाघुले, संजय भोसले, नामदेव वाळुज, तात्याराम गागंर्डे आदी उपस्थित होते. पारनेर च्या तहसीलदार कडे वेगवेगळ्या माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितली होती परंतु सदर अर्जाची माहिती मुदतीमध्ये देण्यात आली नाही

त्यामुळे अपील दाखल करावे लागले सदर अपिलाच्या सुनावणी वेळी तारीख पुढील देण्यात आली परंतु त्यावेळी सुद्धा सुनावणी घेतली नाही व माहिती देखील दिलेली नाही त्यामुळे उपोषण करते यांनी माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांच्याकडे अपील दाखल केलेली आहे

सदरची अपिले प्रलंबित आहे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या खर्चाच्या ऑडिट ची मागणी केली होती सदर मागणीची पडताळणी केली असता

मुख्य निवडणूक अधिकारी यांनी नगरच्या जिल्हा निवडणूक अधिकारी यांना 25 फेब्रुवारी 2019 रोजी पत्राद्वारे कळवले होते परंतु सदर पत्राचा कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही त्यामुळे उपोषण करते यांनी पोषणाचा मार्ग अवलंबला केलेला आहे जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी या गावातून माहिती अधिकार अर्जाचा उगम झाला

परंतु याच जिल्ह्यातील याच तालुक्‍यातील अधिकारी माहिती अधिकार कायदा व माहिती अधिकाराची पायमल्ली करत आहे याला कुठेतरी आळा बसेल अशी व्यवस्था राज्य सरकारने करावी अशी मागणी निवेदनाद्वारे सावकारग्रस्त शेतकरी समितीमार्फत करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe