अहमदनगर जिल्ह्यात आमदार व पोलीस निरीक्षक यांच्यात शाब्दिक चकमक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील राहुरी तालुक्यातील 32गावाच्या आढावा बैठकित आ.लहू कानडे यांनी आ.लहू कानडे व राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात शाब्दीक चकमक उडाली.

पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी तुम्ही आमदार आहात अंगावर धावून आल्यासारखे बोलू नका मी एक शासकीय अधिकारी असल्याचे आ.कानडे यांना सुनावले. याआधी नायब तहसिलदार गणेश तळेकर यांच्यावर आ.कानडे विषय सुचिवरुन चांगलेच भडकले.

देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आढावा बैठक सुरू होताच राहुरीचे नायब तहसिलदार गणेश तळेकर यांना विषय सुचीवरुन फैलावर घेवून इतर अधिकाऱ्यावर पकड मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवळाली प्रवरा येथिल घरफोडी संदर्भात माहिती विचारली असता.

पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास चालू आहे. तपासासाठी स्वतंञ पथक नियुक्त केले आहे.राञीची गस्त असताना घरफोड्या कशा झाल्या. गस्ती वरील पोलीसा कडून खुलासे मागविण्यात येणार आहे.असे सांगताच आ.कानडे यांनी पाच तास दरोडेखोर धुमाकुळ घालतात हि वस्तुस्थिती वृत्तपञातील सांगतो आहे.

मी लोकप्रतिनीधी आहे.तुमच्या खात्याचा काँनस्टेबल नाही.असे म्हणताच पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी तुम्ही आमदार आहात मी शासकीय अधिकारी आहे.अंगावर धावून आल्या सारखे बोलू नका.मी हि 25 वर्ष नोकरी केली आहे.

अंगावर धावून आल्यासारखे बोलू नका असे उत्तर दिले. आ.कानडे यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देवून पोलीस निरीक्षक दुधाळ अवघ्या पाच मिनिटानंतर आढावा बैठक सोडून निघुन गेले. यावेळी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe