अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- सध्याचा काळ कठीण आहे. सरकारला आलेल्या दीड लाख कोटी रुपयांच्या तुटीमुळे इच्छा असुनही राज्य शासनाला विकास कामे करता येत नाही, अशी खंत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
बालमटाकळी येथील ‘शिवरंग’गुळ कारखान्यास आ.पवार यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले,’शिवरंग’चे अध्यक्ष मयूर वैद्य,
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, काकासाहेब नरवडे,मोहनराव देशमुख,’मनसे’चे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे,चंद्रकांत गरड,उपसरपंच तुषार वैद्य,बापुराव धोंडे,सचिन सोनमाळी,सतीष पाटील, संतोष राजगुरू,
राजेश राठोड उपस्थित होते. आमदार पवार म्हणाले, मागील वर्षीच्या खरीप पीक विमा परताव्यातुन बोधेगाव व चापडगाव मंडळ वगळले असल्याचा प्रश्न केला असता तालुका कृषी अधिकाऱ्याकडून माहिती मागवली आहे.
ती मिळाली की स्वतः पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देऊ. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून राष्ट्रवादीवर केल्या जाणाऱ्या टिकेबाबत त्यांना विचारले असता टीका करण्यासाठीच त्यांना आमदारकी दिली असेल.
भाजपाच्या वतीने ते चांगले काम करतात. मात्र खालच्या पातळीवर एखादी व्यक्ती जात असेल तर भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना दिशा देण्याची गरज आहे, असे आमदार पवार म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम