महापौर म्हणाल्या विनाकारण घराबाहेर पडू नका, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी असे आवाहन नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञानी व्यक्त केली.

त्या दृष्टिने मनपाच्या वतीने उपाय योजना करण्यासाठी महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी 19 जुलै रोजी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,

नगरसेवक अनिल शिंदे, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, संभाजी कदम, गणेश कवडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, उपायुक्त यशवंत डांगे, वैद्यकिय आरोग्याधिकारी डॉ. सतिष राजूरकर, डॉ. श्रीमती नलिनी थोरात, डॉ. गणेश मोहळकर,

डॉ. एस.व्ही.चेलवा, डॉ. माधुरी गाडे, डॉ. आरती डापसे, डॉ. कविता माने, डॉ.आएशा शेख आदी उपस्थित होते. यावेळी महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी कोरोना आजारा बाबत माहिती घेतली असता पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मनपाच्या वतीने तिस-या लाटेच्या दृष्टिने उपाय योजनो करण्याच्या सुचना दिल्या. सध्या मनपाचे दोन कोवीड सेंटर सुरू असून आणखी आवश्यकता भासल्या दोन दिवसात कोवीड सेंटर उभारण्याच्या दृष्टिने नियोजन करण्यात आले आहे.

नागरिक विनाकारण बाजारात, रस्त्यावर गर्दी करित आहेत. यामुळे पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. असेही त्या यावेळी म्हणाल्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर लस घेतली पाहिजे. अहमदनगर शहरासाठी जास्तीत जास्त लस पुरवठा होण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे.

मनपाच्या वतीने 65 वर्षा पुढील आजारी नागरिक ज्यांना चालता येत नाही, बेड रेस्ट आहे अशा नागरिकांना लसीकरण घरोघर जावून करण्याच्या सुचना दिल्या. येणा-या संभाव्य कोरोनाच्या तिस-या लाटेबाबत नागरिकांना कोरोनाचा त्रास जाणवल्यास मनपाच्या कोवीड सेंटर मध्ये दाखल व्हावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe