दरोडेखोरांनी कुटुंबियांना धमकावत लुटली रोकड; या ठिकाणी घडली घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत घरातील व्यक्तींना धमकी देत सामानाची उचकापाचक करून १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड व साडे ९ सोने असा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला.

दरम्यान हि धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, येथील माजी वनाधिकारी दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड याच्या घरावर हा दरोडा पडला.

त्यांनी लगेच घटनेची माहिती परिसरातील नातेवाईक यांना फोन वरून कळवली. यावरून परिसरात नातेवाईक व शेजारी यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला असता चोरटे पळून गेल्याने ते सापडले नाही.

यावेळी दौंड यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबत कळविले आहे. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत परिसराची पाहणी केली. तसेच नगर येथील एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

भाजपाचे नेते शिवाजी दौंड यांचे वनाधिकारी दौंड बंधू व आशिष दौंड पुतणे आहेत. दरोडेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी शिवाजी दौड यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News