शेतकऱ्यांची केबल चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  राहुरी तालूक्यात विहिरीवरील मोटरी व केबल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरत आहे.

दिनांक २० जुलै रोजी राहुरी खुर्द परिसरात राजू कल्हापूरे यांची केबल चोरणाऱ्या तिघां जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दिनांक २० जुलै रोजी रात्री साडेआठ वाजे दरम्यान राजू मधुकर कल्हापूरे यांच्या राहुरी खुर्द परिसरातील शेतातून तिघा भामट्यांनी पाच हजार रूपये किंमतीची दोनशे फूट केबल चोरून नेली होती.

चोरीची माहिती मिळताच राजू कल्हापूरे यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन रितसर फिर्याद नोंदवीली. त्यांच्या फिर्यादीवरून बाळू मुरलीधर माळी, रा, टाकळीमिया, शिवा रोहिदास सरोदे रा, राहुरी बुद्रुक ,बाबासाहेब काशिनाथ शेलार रा. वरशिंदे,ता. राहुरी. या तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस एम जाधव हे करीत आहेत. राहुरी तालूक्यात काही दिवसांपासून विहिरीवरील मोटर तसेच केबल चोरी जाण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

नैसर्गिक संकटाला तोंड देता देता शेतकरी मेटाकुटीस आलाय. अशा परिस्थितीत मोटर व केबल चोरी होत असल्याने शेतकरी वर्गातून संतापाची लाट पसरत आहे. या भूरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe