धक्कादायक ! चक्क व्यापाऱ्याची २७० क्विंटल साखर ट्रक चालकांनीच ढापली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-  जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखाना येथून उचललेल्या २७० क्विंटल साखरेची परस्पर विल्हेवाट लावून ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एक जणाविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मंजूश्री महेश करवा (रा. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनोज मानुधने (रा. एरंडोल, जि. जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मंजूश्री महेश करवा (रा. फलटण, जि. सातारा) यांची गणपती एन्टरप्रायजेस नावाची फर्म आहे.

करवा या त्यांच्या पती समवेत साखर कारखान्यांकडून साखर विकत घेऊन मागणीनुसार व्यापाऱ्यांना साखर पुरवठा करतात. व्यवसायातून ओळख निर्माण झालेल्या मनोज मानुधने यांच्यामार्फत प्रकाशचंद ओसवाल (रा. जामनेर, जि. जळगाव) यांना वेळोवळी साखर पाठविली.

यामुळे करवा यांनी मनोज मानुधने यांच्यामार्फत पुन्हा दोन ट्रकमध्ये मिळून तब्ब्ल २७० क्विंटल साखर प्रकाशचंद ओसवाल जामनेर यांना पाठविली. पाठविलेल्या मालाचे पैसे आले नाही म्हणून संबंधित व्यापाऱ्याला फोन केला असता आपल्याकडील कोणत्याही साखरेच्या ट्रक माझ्याकडे खाली झालेल्या नाहीत.

ओसवाल यांनी मानुधने यांनाही फोनवर घेतले. त्यावेळी मानुधने यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी आपली फसवणूक झाल्याचे करवा यांच्या लक्षात आले. करवा यांनी मानुधनेकडे पैशाची मागणी केली असता.

त्यांनी माझ्याकडे पैसे नाहीत काय करायचे करा, असे म्हणत शिवीगाळ करून धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून मनोज मानुधने व दोन ट्रक चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe