अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- वन अधिकाऱ्याकडून १ लाख २० हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना खंडणी बहाद्दर टोळीला लोणी पोलिसांनी मंगळवारी रात्री रंगेहात पकडल्याने इतर खंडणी बहाद्दरांचे धाबे दणाणले.
श्रीरामपुरातील हुसेन दादाभाई शेख याने १९ जुलै रोजी राहाता विभागातील वनरक्षक संजय मोहनसिंग बेडवाल यांना फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत वकिलामार्फत हायकोर्टात जाणार आहे.
तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत मला सर्व माहिती असून २५ लाखांची खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती १२ लाख ठरवण्यात आले. ती दिली नाही, तर हातपाय तोडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
२० जुलै रोजी २ लाख रुपयांची खंडणी घेऊन ये असे धमकावले. याबाबतची माहिती वनरक्षक बेडवाल, वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांना दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ्याचे नियोजन करण्यात आले. ठरल्याप्रमाणे लोणी पोलिस स्टेशनचे पथक, वनरक्षक बेडवाल व दोन पंच असे खासगी वाहनाने लोणीहून श्रीरामपुरातील वॉर्ड नंबर १, साई व्हिला रूम नंबर ३३ येथे राहणाऱ्या हुसेन दादाभाई शेख याच्या घरी आले.
पोलिसांनी बेडवाल यांना मागणी प्रमाणे सापळ्यातील रक्कम १ लाख २० हजार रुपयांची रक्कम देऊन घरात पाठवले. तेथे उपस्थित असलेले अनिल गोपीनाथ आढाव (रा. विरोबा लवनरोड, लोणी खुर्द, ता. राहाता)
सलीम बाबामिय सय्यद (रा माळहिवरा, गेवराई) यांनी रक्कम स्वीकारली. सापळ्यातील नियोजनाप्रमाणे त्यांना रोख रक्कम १ लाख २० हजार रुपये रोख रक्कमेसह पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात येऊन सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील,
पोलिस नाईक संपत जायभाये, दीपक रोकडे, पोलिस कॉन्स्टेबल मच्छिंद्र इंगळे, सोमनाथ वडणे, महिला पोलिस नाईक सविता भांगरे यांनी या तिघांना जरबंद केले. वनरक्षक बेडवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा गुन्हा दाखल केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम