अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- आमच्याकडे गुप्तधन सापडलेले असून, त्यातील सोने अतिशय कमी किंमतीत द्यायचे आहे. असे आमिष दाखवून औरंगाबाद येथील दोघाजणांना ८ लाख ३४ हजार रूपयांना लुटल्याची घटना नगरतालुक्यातील सारोळा कासार शिवारात घडली.
याबाबत मिलिंद कान्हाजी काशिदे (वय-३६, रा. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, हल्ली रा. उस्मानपूरा, औरंगाबाद) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यात संदीप धागे याने आपणाशी संपर्क करत नगरमध्ये गुप्तधन सापडलेले असून, त्यातील सोने स्वस्तात मिळवून देतो, असे आमिष दाखवून पैसे घेवून नगरला यायला सांगितले. त्यानुसार फिर्यादी मिलिंद काशिदे व त्यांचा बंधू, असे दोघेजण नगरमध्ये आले.
त्यानंतर त्यांना नगरपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या सारोळा कासार परिसरातील रेल्वे स्टेशनजवळील सुनसान ठिकाणी बोलाविण्यात आले. त्यावेळी ८ ते १० अज्ञात इसमांनी या दोघा बंधूंवर अचानक दगडाने हल्ला चढविला.
तसेच लाथाबुक्यांनी जबर मारहाण करीत त्यांच्या जवळील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, विविध कंपन्यांचे मोबाईल, घड्याळ असा ८ लाख ३४ हजार रूपये किंमतीचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला व तेथून पोबारा केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम