अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- घरी जात असलेल्या एका तरुणाला दोघांनी दारू पाजण्याचा आग्रह केला. परंतु आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग आल्याने दोघा जणांनी एका तरुणावर चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेत रमजान चिराउद्दीन सय्यद (वय २९, शिरसगाव) हा जखमी झाला आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक एकमधील लबडे पेट्रोल पंपाच्या परिसरात बुधवारी रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शेतकरी तरुण असलेला सय्यद हा घरी जात असताना आरोपी नदीम पिंजारी व राजू जाधव (दोघेही रा. श्रीरामपूर) यांनी त्याला अडविले. दारू पाजण्याचा आग्रह धरला. मात्र आपल्याकडे पैसे नाहीत.
त्यामुळे तुमची मागणी पूर्ण करू शकत नाही, असे सय्यद याने दोघांना सांगितले. सय्यद याच्याकडून नकार मिळताच आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. धारदार चॉपरने पाठीवर वार केले.
हल्ल्यात सय्यद हा गंभीर जखमी झाला. पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी सय्यद याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम