अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यातील पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक 107, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार 189 आणि पोलीस शिपाई ते पोलीस नाईक 207 कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
एकूण 503 पोलीस कर्मचा-यांना पदोन्नती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. जिल्हा पोलीस दलातील रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मार्गी लावला आहे.
यामध्ये पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक 107, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार 189 आणि पोलीस शिपाई ते पोलीस नाईक 207 कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
अधीक्षक पाटील यांच्या या निर्णयामुळे गेल्या दोन- तीन वर्षांपासून पोलीस दलातील रखडेला पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यान पोलीस कर्मचार्यांना पदोन्नती मिळाली असून पोलीस कर्मचार्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम