फादर स्टॅन् स्वामी यांना मरणोत्तर न्याय द्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक केलेले फादर स्टॅन् स्वामी यांच्या निधनाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहे.

त्यांना देशद्रोही ठरवून मारण्यात आल्याचा आरोप करीत स्टॅन् स्वामी यांना जिवंत पणी नाही, पण मरणोत्तर तरी न्याय मिळवून देण्यात यावा, त्यांच्यावरील लागलेल्या आरोपातून त्यांना मुक्त करावे,

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करावे अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रातून शरद पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले व ब्र. सुनील वाघमारे यांनी दिली.

सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात अनेकांनी शरद पवार यांना पत्र लिहून त्यांना यासंदर्भात साकडे घातले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असताना प्रकृती खालावल्याने आणि यातच त्यांचे निधन झाले.

मुंबई उच्च न्यायालयात फादर स्टॅन् यांच्या मरणोत्तर जामीन अर्जावर सुनावणी करताना आदर भावनाही व्यक्त करण्यात आल्या.

या पत्रावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सचिव नोवेल साळवे, जय हिंद सैनिक संस्था संस्थापक अध्यक्ष पंजाबराव मुधाने, फादर मायकल गोन्साल्विस, टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रदेश अध्यक्ष जनार्धन जंगले,

महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले, माध्यम सल्लागार प्रमुख सॉलोमन गायकवाड, अ‍ॅड. सिद्धार्थ खूरांगले, अब्दुल रशिद सरकार, अनिल भोंगाडे, ब्र .सुनील वाघमारे आदींच्या पत्रकावर सह्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!