इंदोरीकर महाराजांबद्दल आताच्या क्षणाची महत्वाची अपडेट वाचा इथे…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्यासंबंधी संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यालायानं दिलासा दिला होता.

लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्या खटल्यात संगनमेर कोर्टानं इंदोरीकर महाराजांच्या बाजूनं निकाल दिला होता.

महाराष्ट्र अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानं इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुत्रप्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या

निवृत्ती महाराज यांच्या विरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये खटला दाखल केला आहे. या खटल्यात संगनमेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूनं निकाल दिला होता.

दरम्यान महाराष्ट्र अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानं इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘सम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो तर विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते.

तसेच स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर आपत्य रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात’, असे वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी वारंवार आपल्या कीर्तनातून करत पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केले होते.

याआधीच्या संगमनेर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी ३० एप्रिलला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता राज्य सरकारनेही अपील दाखल केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe