राहुरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-   शासनाचा ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदेमार्फत रस्ते व पूल परीक्षण कार्यक्रम अंतर्गत राहुरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

मंत्री तनपुरे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून मतदारसंघातील रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.

मंजूर झालेल्या २ कोटींच्या रस्ता कामामध्ये वांबोरी ते नांदगाव (नगर हद्द रस्ता) मजबुतीकरण व डांबरीकरण खर्च ३० लाख रुपये, वळण ते पाथरे रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण खर्च ४० लाख रुपये,

वांबोरी ब्राम्हणी रस्ता ते ससे गांधले वस्ती रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण खर्च ३५ लाख रुपये, पिंपरी अवघड उड्डाणपूल ते देसवंडी खडीकरण रस्ता खर्च २५ लाख रुपये, जांभळी ते बन्शीची वाडी रस्ता खडीकरण करणे खर्च ३० लाख रुपये,

ब्राम्हणी बसस्थानक ते बहिरोबा मंदीर मजबुतीकरण व डांबरीकरण खर्च ४० लाख रुपये मंजूर करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe