लग्नाचा बनाव करून फसवणूक; चार अटकेत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   जुन्नर शहरातील एका तरुणाशी लग्न करण्याचा बनाव करुन फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील चार जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती जुन्नर पोलिसांनी दिली.

जुन्नर शहरालगतच्या कबाडवाडी पाडळी येथील तरुणाशी लग्न करण्याचा बनाव करून लग्नानंतर रोख रक्कम, मंगळसूत्र, चांदीचे दागिने घेऊन नवरी पळून गेल्याप्रकरणी दाखल प्रकरणाचा तपास जुन्नर पोलिसांनी तपास करून यामधील चार आरोपींना अटक केली.

गणेश रामदास पवार याने याबाबत फिर्याद २८ एप्रिलला जुन्नर ठाण्यात दिली होती. त्यानुसार गणपत चौधरी (रा. चांदवड, नाशिक), छाया गायकवाड, रुपाली शिनगारे, सुनीता शिनगारे (सर्व जण रा. खंडाळा, श्रीरामपूर),

रखमाजी गाडे (रा.बेलापूर, श्रीरामपूर) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या आरोपींचा जुन्नर पोलिस शोध घेत होते. सायबरमार्फत या सर्वांचे मोबाईल लोकेशन काढून माहिती मिळाल्यानंतर सहायक फौजदार अनिल लोहकरे,

पोलिस अंमलदार संदीप लोहकरे, प्रशांत म्हस्के, वाल्मीक शिंगोटे, प्रसाद दातीर, मनीषा ताम्हाणे, किरण आघाव, शीतल गारगोटे यांच्या पथकाने चांदवड व श्रीरामपूर येथे येऊन या पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News