राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची वीज ….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- महावितरणची आजमितीस ४० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी वसुलीस पात्र आहे.

तरीदेखील महावितरणचे वीज बिल थकलेय म्हणून कोणत्याच शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची वीज खंडित करण्यात येऊ नये. सद्यस्थितीत वसुलीबाबत शेतकऱ्यांवर मोठा भार टाकणे योग्य होणार नाही. शेतकरी जगला पाहिजे व महावितरण कंपनीही टिकली पाहिजे.

शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा लाभ घेऊन थकीत वीज बिल भरण्यास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

शनिवारी (२४ जुलै) सकाळी ११.३० वाजता अकोले पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील महावितरण प्रश्नांसंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीपूर्वी आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, जि. प. सदस्य सुनीता भांगरे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे यांनी राज्यमंत्री तनपुरे यांचे स्वागत केले. तहसीलदार मुकेश कांंबळे यांनी प्रास्तविक केेेले.

बैठकीस महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता शैलेंद्र मुळे, उपकार्यकारी अभियंता डी. के. बागुल, प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, तहसीलदार मुकेश कांबळे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. विक्रम जगदाळे,

सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, उपअभियंता दिनकर बंड आदी उपस्थित होते. प्रारंभी कार्यकारी अभियंता शैलेंद्र मुळे यांनी तालुक्यातील देवठाण व खिरवीरे हे उपकेंद्र सुरू झाल्यानंतर ओव्हरलोड कमी होण्यास मदत होईल.

वीज बिलांची ३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून महावितरणची वीज उपकेंद्र, ट्रान्सफार्मर सुविधा व इतर प्रश्नांची माहिती दिली. अशोक भांगरे यांनी सातेवाडी, शिरपंजे, अंबित घाटघर, शेरणखेल, दिगंबर येथे नवीन वीज उपकेंद्रांची मागणी केली.

संदीप शेणकर, विनोद हांडे, विकास शेटे यांनी सूचना केल्या. उपकार्यकारी अभियंता डी. के. बागुल यांनी आभार व्यक्त केेेेले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe