सुटीच्या दिवशीही पगार जमा होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- एक ऑगस्टपासून पेन्शन, वेतन आणि ईएमआय यासारख्या महत्वपूर्ण व्यवहारांसाठी सुट्टी असल्यास ताटकळत राहावे लागणार नाही.

रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊस (एनएसीएच)च्या नियमांत बदल केले आहेत. एनसीएच ही यंत्रणा एनपीसीआयकडून हाताळली जाते.

या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डिव्हीडंड, व्याज, वेतन यासारखे व्यवहार पार पडतात. सध्या एनएसीएच ही यंत्रणा बँका सुरू असतानाच काम करते; परंतु एक ऑगस्टपासून ही यंत्रणा सुट्टीच्या दिवशीही कार्यरत राहील.

पैसे काढण्यावर भुर्दंड :- पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजे एक ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबंधीच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्यावर होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ केली आहे. याशिवाय, नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या नियमांतही बदल झाले आहेत.

एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ :- आता भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमात बदल केल्यामुळे इंटरचेंज शुल्क वाढले आहे. परिणामी आर्थिक व्यवहारांवर जादा शुल्क आकारले जाणार आहे. येत्या एक ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरुन 17 रुपये इतके केले आहे, तर बिगरआर्थिक सेवांसाठीचे शुल्क पाच रुपयांवरुन वाढवून सहा रुपये इतके करण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला एटीएमच्या माध्यमातून महिन्याला पाच व्यवहार विनाशुल्क करता येतात. यामध्ये अन्य बँकांच्या एटीएमचा वापर करणेही ग्राह्य ठरले जाते.

आयसीआयसीआय बँकेतून पैसे काढणे :- महाग आयसीआयसीआय बँकेकडून रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. एका महिन्यात फक्त चारवेळा बँक खात्यामधून पैसे काढू शकता.

त्यापेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये द्यावे लागतील. तसेच एका महिन्यात केवळ एक लाख रुपयांची ट्रान्झेक्शन लिमीट ठेवण्यात आली आहे. यापेक्षा अधिक रक्कम काढायची असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe